Crime News : रांजणगावात महिलेचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येचे गूढ कायम, भयंकर माहिती आली समोर…


Crime News : रांजणगाव (शेपुं) येथे एका २९ वर्षीय महिलेचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची गुरुवारी (ता. २३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली, मयत ज्योती राऊत हिने घरगुती वादातून आत्महत्या केली की खून झाला याविषयी गुढ कायम आहे.

पती सुभाष राऊत याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सुभाष गणेश राऊत (३२ रा. भोकरदन जि. जालना) हे रांजणगाव एकतानगर येथे काही दिवसांपूर्वी पत्नी ज्योती (२९), मुलगी साक्षी (१०) व मुलगा पवन (६) यांच्यासह नशीर शेख यांच्या रूममध्ये भाड्याने राहत होते. सुभाष हा बांधकाम मिस्तरी असून त्यास दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नी ज्योतीसोबत कायम खटके उडत असे. दरम्यान, शाळेला सुट्टी लागल्याने राऊत याची दोन्ही मुले ही आजोळी गेल्याने दोघेच घरी होते. Crime News

बुधवारी रात्री सुभाष राऊत मद्य पिऊन आल्याने त्याचे पत्नी ज्योतीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. या दोघा पती-पत्नीत रोजच मांडणे होत असल्याने शेजारीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुभाष व ज्योती यांच्यात वाद सुरुच असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुध विक्री करणाऱ्या आशिया सय्यद या दुध घेवून राऊत यांच्या घरी गेल्या होत्या.

मात्र आवाज देऊन व दरवाजा ठोठावनाही आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने आशिया यांनी दरवाजा लोटला असता त्यांनी घरातील पलंगावर ज्योती निपचित पडलेल्या दिसून आल्या. यानंतर घाबरलेल्या आशिया यांनी आरडा-ओरडा केला असता घरमालक नसीर शेख व शेजाऱ्यांनी घटनास्थळ गाठले असता त्यांना ज्योती बेशुद्धावस्थेत दिसून आल्याने घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच ज्योतीच्या गळ्याजवळ जखमा आढळून आल्या. घटनास्थळी पिको फॉलची पट्टी मिळून आली असून ज्योतीने गळफास घेऊन आत्महत्या केली की पती सुभाष राऊत याने तिचा पट्टीने गळा आवळून खून केला याविषयी गुढ कायम आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.

निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, संदीप शिंदे, पोका यशवंत गोबाडे, सुरेश भिसे, हनुमान ठोके, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील आदींच्या पथकाने ज्योती यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून १२.३० वाजता मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळुंज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!