Crime News : विद्यार्थीनीने छेडछाडीला विरोध केला, धावत्या रेल्वेसमोर फेकले, अन् एक हात, दोन पाय तुटले..

Crime News : उत्तर प्रदेश मध्ये बरेलीच्या सीबीगंज भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीला विरोध केल्यानंतर कोचिंगवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीला दोन मुलांनी ट्रेनसमोर फेकले, त्यामुळे तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले. तसेच पीडित गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु आहे.

पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबाला सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, ही विद्यार्थीनी क्लासला ये-जा करत असताना आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदार तिची नेहमी छेड काढत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली होती. परंतू, तरीही ते सुधरले नाहीत, असे पीडितेच्या वकील काकांनी सांगितले.

मंगळवारी देखील ती नेहमीप्रमाणे क्लासला गेली होती. सायंकाळी परतत असताना खडळ रेल्वे क्रॉसिंगजवळ ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. तिचे दोन्ही पाय कापले.होते. चौकशी केली असता, त्याच दोन तरुणांनी तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केल्याचे निष्पन्न झाले. विरोध केल्यावर तिला रेल्वेसमोर फेकण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी लक्ष घातले असून अधिकऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. बुधवारी सकाळी आयुक्त सौम्या अग्रवाल, आयजी राजेश कुमार सिंह, डीएम रवींद्र कुमार आणि एसएसपी घुले सुशील चंद्रभान यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीय आणि डॉक्टरांशी चर्चा केली. याप्रकरणी एसएसपींनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित केले आहे.