Crime News : अश्चिल हावभाव करून देहप्रदर्शन करत लोकांना उत्तेजीत करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या…


Crime News : चौफुला परिसरात ये-जा करणाऱ्या पुरुषांना अश्लील हावभाव, हातवारे करून शारीरिक संबंधासाठी उत्तेजित करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती केडगाव पोलीसांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, चौफुला ते सुपा रोडवर पीएमटी बस थांब्यापासून काही अंतर असलेल्या पुलाजवळ काही महिला तोकडे कपडे घालून उत्तांग देहप्रर्दशन करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेश्यागमनास प्रवृत्त करीत असल्याची माहिती मिळाली.

केडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार बी.पी. शेंडगे, पोलीस हवालदार पी.एस. मस्के, महिला पोलीस शिपाई स्वप्नाली टिळवे, पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी तातडीने महिला पंच घेऊन माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेतली.

यावेळी बोरीपार्धी – चौफुला हददीत केडगाव ते सुपा रोडवरील पुलावर पी एम टी बस थांबाजवळ ६ ते ७ महीला अश्लील वर्तन करून पुरुषांना अश्लील हावभाव हातवारे करून शारीरीक संबंधाकरीता उत्तेजीत करीत होत्या. Crime News

शरीराचे बिभत्सरित्या प्रदर्शन होईल या हेतूने अश्लील अंगविक्षेप करून बुध्दीपुरस्पर अश्लील हावभाव हातवारे करून येणा-या जाणा-या लोकांना वेश्यागमनास प्रवृत करण्याकरीता स्वतःचे देहप्रदर्शन करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जवळ जाऊन अंगाशी लगड, घसट करण्याचा प्रयत्न करुन लोकांना उत्तेजीत करत असल्याचे दिसून आले.

या प्रकरणी पोलीसांनी उरुळी कांचन आणि दौंड तालुक्यातील सात महिलांना ताब्यात घेतले. मंगळवारी (ता.३) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या आसपास पोलीसांनी ही कारवाई केली

. याप्रकरणी पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी फिर्याद दिल्याने सात महिलांवर सार्वजनिक ठिकाणी अश्चिल हावभाव, हातवारे करून लोकांना वेश्यागमनास प्रवृत्त केल्याने अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केडगाव पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!