Crime News : धक्कादायक! काकाचे मोबाइल हॅक करुन व्हिडिओ पाहायचा, वैयक्तिक डेटा चोरुन डिलीट केल्याने उडाली खळबळ…


Crime News  : राज्यात सायबर क्राईमच्या घटना वाढल्या आहेत. सायबर विभागाकडे रोज फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे.

गावाकडे राहणाऱ्या काकांनी पुतण्याच्या मदतीने मोबाइलमध्ये ई-मेल सुरू केल्यावर पुतण्याने केलेल्या तांत्रिक गौडबंगालातून थेट ‘डेटा’ चोरी करून डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. Crime News

काकाच्या मोबाइलमध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक ‘ई-मेल’ला जोडून दोन मोबाइल ‘हॅक’ केल्याने सायबर पोलिसांत पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक सुभाषचंद्र कुलकर्णी (वय. ३७, रा. उत्तमनगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. चाळीसगावात उमेश मधुसुदन कुलकर्णी (वय ५६) यांनी नाशिक सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. Crime News

मिळालेल्या माहिती नुसार , उमेश हे चाळीसगावात पौराहित्य करतात. त्यांचा पुतण्या दीपक याने १३ ऑगस्ट २०२३ रोजी उमेश यांचे दोन मोबाइल हॅक केले. उमेश यांच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांकासह वैयक्तिक छायाचित्रे, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाचा डेटा डिलिट केला. त्यावरून उमेश यांनी पुतण्याविरोधात फिर्याद दिली.

उमेश यांच्या मोबाइलमध्ये काही महिन्यांपूर्वी ई-मेल खाते सुरू करायचे होते. त्यावेळी त्यांनी पुतण्याची मदत घेतली. पुतण्याने काकांना ई-मेल सुरू करून देतांना तिथे ‘टू-स्टेप व्हिरिफिकेशन’मध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक नोंदविला. त्यामुळे एका प्रकारे काकाच्या मोबाइलचा ‘अॅक्सेस’ ई-मेलच्या माध्यमातून पुतण्याकडेही राहिला.

फिर्यादी हे त्यांच्या मोबाइलमध्ये संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओ किंवा इतर डेटा संकलित करीत होते. या संपूर्ण डेटाचा ‘बॅकअप’ ई-मेल ड्राइव्हवर सेव्ह होत राहिला. हा डेटा पुतण्या स्वत:च्या क्रमांकावरून ई-मेल उघडून नाशिकमध्ये बघायचा. त्याने ऑगस्ट महिन्यात अचानक काकांच्या दोन्ही मोबाइलमधील डेटा ई-मेलच्या माध्यमातून डिलिट केला. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!