Crime News : घरात घुसून विवाहितेवर गँगरेप, जोडप्याने उचलले धक्कादायक पाऊल, देशात खळबळ..
Crime News : उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका विवाहितेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. नराधम आरोपींनी मध्यरात्री घरात घुसून अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेसह पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. (Crime News)
याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून हा सामूहिक बलात्कार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आदर्श (वय. २५) आणि त्रिलोकी (वय. ४५) असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवारी (ता. २१) मध्यरात्री दोन जणांनी घरात घुसून विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप जोडप्याच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित जोडप्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्या व्हिडीओत त्यांनी आरोपींची नावे सांगितली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मृत व्यक्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.