Crime News : अजित पवार गटातील आमदाराच्या स्वीय सहायकाचा मृत्यू, भयंकर माहिती आली समोर, गूढ वाढले…


Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या खासगी पीएचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत एका बारसमोर रविवारी रात्री ही घटना घडली आहे.

प्रशांत सुरेश भोईर (वय,३० रा. वाशिंद ) असे अपघातात मृत्यू झालेल्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अपघातातील मृत प्रशांत हे वांशिदमध्ये कुटूंबासह राहून शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे खासगी पीए म्हणून कार्यरत होते.रविवारी मध्यरात्री तक्रारदार रविंद्र गणपत मडके हे मित्रांसह कारमधून दारू पिण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत एका बारमध्ये आले होते.

त्यावेळी मयत प्रशांत हा दोन मित्रांसह दुसऱ्या कारमधून त्याच बारमध्ये दारू पिण्यासाठी आला. त्यानंतर पहाटे १ वाजून २० मिनिटाने बार बंद झाल्याने तक्रारदार रविंद्र मडके व त्यांच्यासोबतचे मित्र आणि प्रशांतसह त्याच्यासोबत असलेले मित्रही बार बंद झाल्याने घरी जाण्यास निघाले. Crime News

पण, प्रशांत ज्या कारमधून आला होता, त्या कारचालक मित्राने तक्रारदार रविंद्र यांना मोबाईलवर संपर्क करून सांगितले कि, प्रशांत आमच्या कारमध्ये नाही तुम्ही येताना त्याला कार मधून घेऊन या. त्यामुळे, मडके यांनी कार पुन्हा बार कडे वळवून आणली असता, मुंबई नाशिक महामार्गावरील स्वागत बार समोर प्रशांत गंभीर जखमी अवस्थेत पडून होता.

ही घटना पाहताच दोन्ही कारमधील मित्रांनी जखमी प्रशांत यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने कार्डिओ रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. येथील रुग्णालयातील डॉक्टरने तपासून मृत घोषित केल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आणला होता.

दरम्यान, या घटनेची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रशांत यांचा नेमकं अपघात कसा झाला, हे गूढ कायम असून या घटनेनंतर संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार, पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!