Crime News : शिक्षकाचं भयंकर कृत्य! शिकवणीला येणाऱ्या मुलीसोबत भयंकर घडलं, क्लासला दरवाला लावला अन्…

Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नालासोपाऱ्यात गुरू शिष्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. खाजगी कॉम्प्युटर चालवणाऱ्या एका शिक्षकाने शिकवणीला येणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी आथा आता पीडित पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात बी एन एस कलम 74 सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाा पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहे. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, नराधम शिक्षक हा तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओसवाल नगरी परिसरात एक खाजगी कॉम्प्युटर क्लासेस चालवतो. या क्लासेसमध्ये अनेक अल्पवयीन मुली या शिकवणीला येतात.
या पीडित मुलींना क्लासमध्ये बोलावून ‘तुम घर का टेन्शन मत लो, सबके घर में झगडा चालू रहता है’, असे बोलून धीर देण्याच्या नावाखाली क्लासचा दरवाजा लावून मिठी मारून लैंगिक शोषण करायचा,असा आरोप पीडीत मुलींनी केला आहे.
दरम्यान, या तक्रारीवरून उद्देश कुमार जवाहरलाल प्रसाद याच्या विरोधात बी एन एस कलम ७४ सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास तुळींज पोलीस करत आहेत.