Crime News : चिकनसाठी सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावासोबत जे केलं ते पाहून घरातले हादरलेच…

Crime News : राजस्थानमधील अलवरमधील तिजारा भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने मोठ्या भावाची चाकूने हत्या केली आहे. या हत्येचे कारण समजल्यावर सगळ्यांचा धक्का बसला आहे.

मोठा भाऊ घरी चिकन घेऊन आला होता. त्याने लहान भावाला चिकन बनवायला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. यादरम्यान, तरुणाने मोठ्या भावावर इतके वार केले की त्याच्या शरीरातील अवयव बाहेर आले. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, तिजारा पोलिस ठाण्याच्या शाबाद गावात राहणारे किशोरी लाल यांना तीन मुलं आहेत. घर चालवण्यासाठी तिघेही मजुरीचे काम करतात. त्यातील भुड्डन नावाच्या मुलाने बाजारातून चिकन आणले.

भुड्डनने लहान भाऊ जगदीशला चिकन बनवायला सांगितले. याचा राग जगदीशला आला आणि चिकन बनवायला नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. जेव्हा त्यांची आई मध्यस्थी करण्यासाठी आली तेव्हा दोघांनी तिला धक्काबुक्की केली.

आवाज ऐकून गावातील लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमधील वाद वाढत गेला. दरम्यान, जगदीशने घरात ठेवलेला मांस कापण्याचा चाकू आणून भुड्डनच्या पोटात वार केले. जगदीशने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले, त्यामुळे त्याच्या शरीरातील अवयवही बाहेर आले. घटनेनंतर जगदीशने घटनास्थळावरून पळ काढला.
यावेळी कुटुंबीयांनी भुड्डन यांना तत्काळ तिजारा येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अलवर येथे रेफर केले. अलवर येथील राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये भुड्डनचा मृत्यू झाला.
दरम्यान याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.