Crime News : सांगलीत २८ वर्षीय नराधमाकडून नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ‘त्या’ व्हिडिओ दाखवून अत्याचार, घटनेने सगळे हादरले..
Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. आता सांगलीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शहरातील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना समोर आली आहे. २८ वर्षीय नराधमाने ९ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, आटपाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका जीम चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आरोपी सध्या जेलमध्ये असतानाच या अल्पवयीन मुलीवर चार दिवसांपूर्वी तीन अज्ञातांकडून कटरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. Crime News
सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. मात्र मुलीच्या अंगावरील कपडे या हल्ल्यात फाटले. मुलगी भांडी घासत असताना मुलीवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाल्याची मुलीच्या कुटुबीयांनी तक्रार दिली आहे.