Crime News : धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला!! ३१ वर्षाच्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार…

Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अकोला शहरातील एका भागात रविवारी ३१ वर्षीय मद्यपी मुलाने आपल्या ५९ वर्षीय मातेवर अत्याचार केल्याच्या घटनेने राज्य हादरले आहे. या विकृत मुलास पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नेहमीच मद्याच्या आहारी गेलेला असायचा आणि यापूर्वीही आपल्याबत वाद घालत असे. कधी मधी तो सेंट्रींग चे काम करायचा बहुता बेरोजगार असल्याने त्याला हे मद्याचे व्यसन जडले होते.

रविवारी रात्री त्याने घरात मद्याच्या नशेत असताना आपलीच ५९ वर्षीय माता हिला बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार केला असला तरी आरोपीने तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. Crime News
या कृत्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मुलाने मद्याच्या नशेत आपल्या राहत्या घरातच आपल्या जन्मदात्रीवर बळजबरीने अत्याचार केला. या विकृत कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.