Crime News : शिक्षक पित्याचा घाणेरडं कृत्य! ३ वर्षीय मुलीवर अत्याचार, डॉक्टर-डॉक्टर खेळू म्हणत केलं संतापजनक कृत्य..


Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. डॉक्टर-डॉक्टर खेळू असे म्हणत पोटच्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर पेशाने शिक्षक असलेल्या बापाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक असलेल्या बापाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या. Crime News

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी हा अभियंता असून तो एका इंग्रजी शाळेत शिक्षक आहे. त्याला एक तीन वर्षाची मुलगी असून दोन महिन्यांपुर्वी नुकताच एक मुलगा देखील झालेला आहे. रविवारी दुपारी घरात एकटा असताना बापाने तीन वर्षीय चिमुकलीला डॉक्टर डॉक्टर खेळण्याचे सांगत तिच्यावर अत्याचार केला.

रात्रीच्या सुमारास अचानक तिला ताप आल्याने आईने तिला उठवले असता जांगेतून रक्त निघत असल्याचे दिसले. आईने तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता घटनेचे बिंग फुटले. आईने मुलीला विश्‍वासात घेऊन विचारपुस केली असता बापाने क्रुरतेने अत्याचार केल्याची कबुली दिली. तसेच कोणाला काही सांगितले तर जीवे मारीन, अशी धमकीही दिली.

घटनेनंतर बाप घर सोडून वडिलांच्या घरी निघून गेला. चिमुकलीच्या आईने मोबाइलवरून पतीला जाब विचारला असता त्याने उलट पत्नीला शिवीगाळ करत गप्प बसण्यास सांगितले. आईने तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक हारुन शेख यांनी चिमुकलीची घाटीत तपासणी केली असता अत्याचार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.

यावरून त्यांनी चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवत मंगळवारी पहाटेच्या सुमारास हर्सूल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास तपास सहायक निरीक्षक हरेशवर घुगे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!