Crime News : एडमिशनमध्ये मध्यस्थी करणारांपासून सावधान, बारामतीत १५ लाखाची फसवणूक, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Crime News : फसवणुकीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना बारातमातीतून समोर आली आहे. बारामती शहरातील स्थापत्य अभियंत्याला त्याच्या मुलीच्या ऍडमिशन साठी १६ लाख रुपयांची मागणी केली व ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अभियंत्याची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पुण्यातील दोन भामट्यांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शहरातील टाटिया इस्टेट पाटस रोड येथील राजेश सदाशिव शिंदे यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
या फिर्यादीनुसार पोलिसांनी पुण्यातील नांदेड सिटी येथील संजय शंकर लाल शहा आणि दुसरा भामटा हडपसर येथील ग्रेव्हीला मगरपट्टा सिटी मधील प्रीतम शंकरराव तिपायले या दोघांविरोधात पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, राजेश शिंदे यांच्या मुलीस बी ए एम एस साठी प्रवेश हवा होता. त्याकरता हे दोन भामटे एजंट शिंदे यांना भेटले. त्यांनी १६ लाख रुपये मागितले. Crime News
तसेच सप्टेंबर २०२२ ते २७ डिसेंबर २०२३ यादरम्यान शिंदे यांनी हरिद्वार येथील पतंजली फेज दोन जवळील अरोमा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही रक्कम शहा आणि तिपायले या दोघांना दिली.
यातील फक्त एक लाख रुपये या दोघांनी या कॉलेजमध्ये भरले. उर्वरित पैसे स्वतःसाठी वापरले आणि जेव्हा शिंदे यांनी त्यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांना दमदाटी केली व पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे शिंदे यांनी बारामती शहर पोलिसांकडे धाव घेतली व फिर्यादी दिली.या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.