‘उरुळीकांचन ‘ला देशी व जर्सी गाईचे मांस विक्रीच्या गाईंची कत्तल ! दोघांवर गुन्हा दाखल; दोघांचा तस्करी करुन मांस विक्रीचा गोरख धंदा उघड ..!

उरूळी कांचन : देशी व जर्सी गायांचे मांस विक्री करण्यासाठी गायांची कत्तल करणाऱ्या दोघांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हात गुन्हा दाखल होणारे दोघेही मोकाट पक्षु -प्राण्यांची रासरोसपणे शिकार होत असल्याचे उघड झाले आहे.
गंगाराम पवार (रा. चौफुला ता. दौंड, जि.पुणे ) व कैलास सोपान ढावारे (रा. गोळेवस्ती, उरूळी कांचन ) या दोघा तस्करांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गोहत्या रक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा.उरुळीकांचन) यांनी या तस्करीचा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी कायदेशीर तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरक्षक मित्र आकाश मधुकर लांडगे, तेजेस बजरंग संकर, रोहण शिंदे, शुभम खताळ, गौरव कलगुंडे, शुभम लोखंडे यांना उरुळीकांचन ग्रामपंचायत हद्दीत गोळेवस्ती, येथे शंभो डेव्हलपर्स प्लॉटींग पाठिमागे पडीक व न वापरत्या घरात देशी गाईचे एक लाल रंगाचे गाईचे कापलेले धड सापडले तसेच कैलास सोपान ढावारे याचे घराजवळ एक मोठी काळे पांढरे रंगाची जर्सी गाय व एक लहान काळे पांढरे रंगाचे गाईचे वासरू दिसले.
त्यानंतर अधिक गंगाराम पवार व कौलास ढावारे हा मांसविक्रीसाठी मोकाट जणावरांची कत्तल करुन बाजारात विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी रक्षक कायद्यानुसार गुन्हा करण्यात आला आहे.