वरबाप धाकट्याचं ठरलं थोरल्याचं कधी? अजितदादांनी एकाच वाक्यात सांगितलं, जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर दादा काय म्हणाले?

पुणे : काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा झाला. राजकारणामुळे फुट पडलेल्या पवार कुटूंबाला एकत्र येण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. जय पवार यांचा साखरपुडा थाटात पार पडला. ऋतुजा पाटीलसोबत जय पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
अशातच आता साखरपुड्यानंतर अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमात ज्योतिबा फुले जयंती निमित्त हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी फुले वाड्याबाबत आजूबाजूची जागा घेऊन एक चांगलं स्मारक बनवायचं आहे, असं वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांनी पार्थ पवारांच्या लग्नावर देखील चर्चा झाली. यामुळे एकच हशा पिकला.
आता सर्वांना असा प्रश्न पडलाय की, पार्थ पवारांचा साखरपुडा कधी होणार? पार्थ वयाने मोठे आहेत, असा प्रश्न अजितदादांना विचारला गेला. यावर अजित पवारांनी थेट उत्तर दिल. ते म्हणाले, त्याचं काय आहे की, जयने ठरवलं पार्थने ठरवलं की त्याचं करू’, असं अजित पवार म्हणाले. यामुळे याची चर्चा रंगली.
जय पवार यांचा साखरपुडा झाला. संपूर्ण पवार कुटूंबीय एकत्र होतं, सर्वत्र आनंदाचं वातावरण बघायला मिळाले. अजित पवार स्वतः शरद पवार यांच्या स्वागतासाठी गेले होते. या कार्यक्रमाचे फोटो आणि विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.पक्षातील काही प्रमुख नेते सुद्धा जय पवार यांच्या साखरपुड्याला हजर होते.
पवार कुटुंबात आलेल्या वादळानंतर आता घरात होत असलेल्या मंगल कार्यालयामुळे संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत.