राज्यासह देशात कोरोनाला आकडा वाढला, दिवसभरात 4 हजार रुग्ण, पुण्यात एकाचा मृत्यू….!


पुणे : देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. भारतात पुन्हा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 435 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

 

कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट झाली आहे. देशात सध्या एकूण 23 हजार सक्रीय रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

 

 

 

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 98 कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. कोरोनामुळे दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. पुणे मनपा हद्दीत 63 कोरोना रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात अजूनही 756 सक्रीय रुग्णसंख्या असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

 

 

 

 

 

 

मुंबईत काल 221 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 1 हजार 244 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत दररोज 200 पेशा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच मास्क देखील वापरावे लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!