नागपूर जिल्हा बँक घोटाळा: काँग्रेस नेते सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा…


नागपूर : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर शिक्षाही सुनावली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनिल केदार आणि इतर दोषींना ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

कोर्टाने सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष) यांच्यासोबत केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी ठरवले होते.

सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर सुनील केेदार यांना सौम्य शिक्षेची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. सुनिल केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज शुक्रवार (ता.२२) सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सत्र न्यायायलाच्या अतिरिक्त न्यायाधीश जे व्ही पेखळे- पुरकर यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणात सुनील केदा यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठी, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार, सुरेश पेशकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!