मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांची खेडमध्ये 19 मार्चला सभा….!

खेड : मागील दोन दिवसंपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आता या सभेला प्रत्युत्तर म्हणुन 19 मार्चला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली होती त्याच ठिकाणी आता त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत.

यासंदर्भात बोलताना रामदास कदम म्हणाले, व्याजासहित सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे रामदास कदमांनी रविवारी जाहीर केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान,ही सभा 19 मार्चला होणार असून या सभेला मंत्री गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई त्याचबरोबर आमदार भरत गोगावले हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे.

Views:
[jp_post_view]