नागरिकांनो सावधगिरी बाळगा! राज्यात पावसाचा यलो अलर्ट, पुणे घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ कायम..


पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते, पण आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने आज ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.

उत्तर कोकणात पावसाचा जोर अधूनमधून वाढण्याचा अंदाज आहे, तर दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. नागरिकांना प्रवास करताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई-कोकणापेक्षा पुणे घाटमाथ्यावर पावसाचा धोका अधिक असल्याने हवामान विभागाने या भागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून, रस्ते प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरडी कोसळणे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे होणारा अडथळा टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने त्रस्त असलेल्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र आज पावसाचा जोर ओसरला आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतीसाठी हा पाऊस योग्य ठरण्याची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!