दीनानाथ मंगेशकर रूग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबीयांनी भेट घेताच मुख्यमंत्री आक्रमक, रुग्णालयाबाबत घेतला मोठा निर्णय..

पुणे : भाजपा आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवतीला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी त्यांच्या कुटुंबियांकडे केली होती.
यानंतर प्रशासनाने १० लाखांची मागणी केली. महिलेच्या कुटुंबाने ३ लाख भरण्याची तयारी दाखवली, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला प्रवेश नाकारला. रुग्णालय प्रशासनाच्या या आडमुठेपणामुळे तनिषा भिसे यांनी जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उससली यह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आमदारां अमित गोरखे आणि भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भिसे कुटुंबाने भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज भिसेकुटुंबीयांनी माझी भेट घेतलेली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत मी त्यांना आश्वस्त केले आहे. मी तयार केलेली कमिटी या ठिकाणी आलेली आहे. मी या प्रकरणात सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, भविष्यात पुन्हा असे प्रकरण घडू नये म्हणून नियमावली करणे आवश्यक आहे. दिनानाथ मंगेशकर रूग्णालय हे स्वर्गीय लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबाने खूप मेहनतीतून उभारलेले आहे. नावाजलेले रूग्णालय आहे. तिथे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळे चूक आहे असे म्हणून चालणार नाही. मात्र काल घडलेला प्रकार हा असंवेदनशीलच होता. असे ते म्हणाले आहे.