Chhatrapati Sambhaji Nagar News : तलावात पोहायला गेले अन् क्षणात सगळे संपले, चौघांचा दुर्दैवी मृत्यू, कुटूंबाचा एकच आक्रोश…


Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले आहे.

बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय.१२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय.१२ वर्षे), जावेद शेख (वय.१४ वर्षे), अबरार जावेद शेख (वय. १२ वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावे आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात एक तलाव आहे. या तलावामध्ये पोहण्यासाठी चार मुले गेली होती. मात्र या चारही मुलांना पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. Chhatrapati Sambhaji Nagar News

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली. त्याचबरोबर तहसीलदार देखील घटनास्थळी पोहोचले. या चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले.

दरम्यान, या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मुलांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!