Chhatrapati Sambhaji Nagar : डिअर अहो, बाय! यू आर फ्री… काळीज पिळवटून टाकणारी ‘सुसाईड नोट’, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं….
Chhatrapati Sambhaji Nagar : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात संताप आणि चिंतेचे वातावरण असतानाच छत्रपती संभाजीनगर येथे एका डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
प्रतिक्षा प्रीतम गवारे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच डॉक्टर महिलेने आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेनं सुसाइड नोट देखील लिहिली आहे. सात पानांची ही सुसाईड नोट. डोळ्यात पाणी आणणारं ही चिठ्ठी.
प्रतिक्षाने चिठ्ठीत पती आपल्या चारित्र्यावर सतत संशय कसा घेत होता, याबद्दलही सांगितले आहे. तसेच हुंडा आणि फर्निचरसाठी त्याने सतत तगादा लावला होता. या प्रकरणी प्रतिक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम शंकर गवारे असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रतिक्षाने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलं?
डिअर अहो, खूप प्रेम केल हो तुमच्यावर जिवापाड देत स्वत:ला विसरुन गेले. तुम्ही माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलंत. तुम्ही एका स्वावलंबी मुलीला dpendent बनवलं. तुम्ही खूप स्वप्न घेऊन लग्न केले होते तुमच्याशी. हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील. करिअरमध्ये सपोर्ट करतील.आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर आज ही वेळ आणलीत तुम्ही माझ्यावर.
तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं, मी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी, भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा, म्हणून त्यांनाही त्यांनाही बोलत नव्हते जास्त. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला, नंबर बदलण्यासाठी वाद घातले, त्यासाठी पण तयार झाले. पण तुमचे doubts काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आहे आणि राहिल. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं.
तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.
अहो, तुमच्या overpassesiveness आणि dominating nature मुळे मला खूप प्राप्त झालाय. माणसान एवढे dominating नसावं. जगायचं होतं मला, पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही, मला फक्त restrictions मध्ये ठेवलं. ह्याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवतेय. गोड आहात दिसायला, गोडच रहा…. आणि कधी थोडं पण प्रेम केलं असेल तर मला tight hug करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
तुमचीच, प्रतीक्षा