Chhagan Bhujbal : छगन भूजबळांना का ठेवलं मंत्रिपदापासून दूर? महत्वाची माहिती आली समोर..

Chhagan Bhujbal : रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे.

मात्र महायुती सरकारच्या झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना वगळण्यात आलं. दरम्यान, छगन भुजबळांना मंत्रिपदापासून डावलण्यात आल्याची अनेक कारणं समोर आली आहे.
पक्षांतर्गत नाराजीमुळे छगन भुजबळ मंत्रिपदापासून दूर असल्याची माहिती आहे. तर यासंदर्भातील कारणं समोर आली आहेत. तर निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याने पक्षातील लोकांची छगन भुजबळ यांच्यावर नाराजी असल्याची माहिती आहे. Chhagan Bhujbal

छगन भुजबळांनी बळजबरीने मुलगा पंकज भुजबळ यांच्यासाठी विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली, त्यामुळे नाराजी पाहायला मिळतेय. दरम्यान, छगन भुजबळांनी आपल्या मुलासाठी केलेलं कृत्य पक्षातील वरिष्ठांना आवडलं नसल्याची माहिती दिली आहे.
यासोबतच पुतण्या समीर भुजबळ यांनी महायुतीविरोधात अपक्ष अर्ज भरल्यानंही रोष व्यक्त होत असल्याची माहिती आहे. नाशकातील सर्व आमदारांनी छगन भुजबळांना मंत्रिपद देऊ नका, अशी अजितदादांकडे विनंती केली. जर छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यास नाशकातील सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला होता, अशी माहिती देखील मिळाली आहे.
