Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘सरकारने काढलेला अध्यादेश नाही, तो…

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंसह लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारने काढलेला अध्यादेश नाही. तो एक मसुदा आहे. त्याच्यावर हरकती मागवल्या आहेत. हरकती येतील. आमचा अभ्यास सुरू असेल. त्यानंतर कोर्टामध्ये जाण्यात येईल. उद्या दुसरे कोणी लाखो लोक घेऊन येईल. त्यांना देखील हवं तसं आरक्षण देणार का, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
आपण आजवर ५० टक्क्यांच्या समुद्रात पोहोत होतो, आता विहिरीत पोहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही. ही सूचना आहे १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. जे वकील आहेत त्यांनी हरकती पाठवाव्यात, लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात, सरकारच्या लक्षात येईल, की याची दुसरी बाजू आहे.
मराठा समाजाचा विजय झाला असं मला वाटतय, परंतू मला काय तस काय वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना न घाबरता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रीमंडळानी घेतली आहे.
आता ही एक सूचना असून याच रुपांतर नंतर होणार. १६ फेब्रुवारी पर्यंत याच्यावर हरकती मागवल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजाचे वकील असतील यांनी अभ्यास करून या हरकती पाठविण्याचे काम करावे. ओबीसीच्या सर्व कार्यकत्यांनी देखील अशा हरकती पाठवा. Chhagan Bhujbal
सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात ठिकणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिसली आहे. ओबीसीमध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं आहे असं मराठा समाजाला वाटतंय मात्र पण तुम्ही दुसरी बाजू लक्षात घ्या. ५० टक्क्यांमधील संधी मराठा समाजाने गमवली आहे. १७ टक्क्यांत ८०-८५% ओबीसी येतील. जात ही जन्माने येते. ते एखाद्याच्या पत्राने येत नसते. असे ते म्हणाले आहे.
सरसकट गुन्हे मागे घ्या ही मागणी मान्य झाली. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. उद्या कोणी घरे जाळली तरी गुन्हे मागे घ्या, असे कसे चालणार आहे, असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला विचारला. मराठा समाजातील सर्व मुले आणि मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला. मग फक्त त्यांनाच मोफत शिक्षण का? सर्वांचे शिक्षण मोफत द्या.
फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी? असा प्रश्न त्यांनी विचारला. आता सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या पाच वाजता सरकारी निवासस्थानी छगन भुजबळ यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पक्षांनी ओबीसीच्या छत्राखाली एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.