Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची तोफ आज इंदापूरमध्ये धडाडणार, सभेची जोरदार तयारी…
Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. या विषयावरून इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) नेते अशी ओळख असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक संघर्ष वैयक्तिक टीकेवर येऊन पोहोचला आहे.
दोन्ही बाजूने राज्यभरात मोठ्या सभा होत असल्याने ध्रुवीकरण होत आहे. ओबीसींच्या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळ देखील मैदानात उतरले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळ यांची पहिली ओबीसी एल्गार सभा पुणे जिल्ह्याच्या इंदापूर मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत. Chhagan Bhujbal
दुपारी एक वाजता ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास दीड लाख ओबीसी बांधव येण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
इंदापूर शहरालगत असलेल्या शंभर फुटी मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मैदानामध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा झाली होती त्याच मैदानात ओबीसी मेळावा होत आहे.