काय सांगता! या देशात मिळतं जगातील सर्वात स्वस्त सोनं, दुबईतही यापेक्षा महाग आहे गोल्ड..

नवी दिल्ली : भारतात सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे दरात मोठी वाढ होताना दिसते. तसेच गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
प्रत्येक भारतीय महिलेला आणि पुरुषालाही आपल्या अंगावर सोने असावे, अशी इच्छा असते. सोने हे केवळ दागिने नसून ते गुंतवणुकीचे माध्यम म्हणूनही अनेकजण त्याकडे पाहतात आणि आपला पैसा गुंतवतात. भारतात आता सोन्याच्या किमतींनी कळस गाठला आहे. सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर त्याच्या किमती गेल्या आहेत.
त्यामुळे दुबई आणि इतर अरब देशांतून सोने आणण्याकडे अनेकांचा कल आहे; पण दुबई पेक्षाही स्वस्त सोने जगात आणखी एका देशात मिळते. जगातील सर्वात स्वस्त सोने कोणत्या देशात मिळते असा प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तर भूतान असे आहे. जगातील सर्वात स्वस्त सोने आशियाई देश भूतानमध्ये मिळते.
भूतानमध्ये सर्वात स्वस्त सोने मिळण्याची अनेक कारणे आहेत. भूतानमध्ये स्वस्त सोने मिळण्याची अनेक कारणे असली, तरी सर्वात मोठे कारण म्हणजे भूतानमध्ये सोने हे करमुक्त आहे. सोने स्वस्त असण्याचे तेच सर्वात मोठे कारण मानले जात आहे.याशिवाय भूतानमध्ये सोन्यावर कमी आयात शुल्क आहे. भूतान आणि भारताच्या चलनाचे मूल्य जवळपास सारखेच आहे.
भूतानमधून सोने खरेदी करताना काही अटी लक्षात ठेवाव्या लागतील. सोने खरेदी करण्यासाठी पर्यटकांना भूतान सरकारने प्रमाणित केलेल्या हॉटेलमध्ये किमान एक रात्र मुक्काम करावा लागतो.पर्यटकांना भूतानमध्ये सोने खरेदीसाठी अमेरिकन डॉलर आणावे लागतात.पर्यटकांना शाश्वत विकास शुल्क (एसडीएफ) भरावे लागते.
त्याच वेळी भारतीयांना प्रति व्यक्ती प्रतिदिन १,२०० ते १,८०० रुपये मोजावे लागतात.पर्यटकांना सोने खरेदी करण्यासाठी पावती घेणे आवश्यक आहे. भूतान मधील ड्युटी फ्री शॉपमधून ड्युटी फ्री सोने खरेदी करता येते. ही दुकाने सामान्यतः लक्झरी वस्तूंची विक्री करतात आणि ती वित्त मंत्रालयाच्या मालकीची असतात.