जेजुरीतील खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने ३० डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल, जाणून घ्या…

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत मोठा बदल केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी व इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. याबाबत माहिती दिली गेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी- सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक बंद करुन त्यावरील वाहने नीरा- मोरगाव- सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात आली आहे.

तसेच या दिवशी पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक बेलसर- कोथळे- नाझरे- सुपे- मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. ऐनवेळी याबाबत बदल न करता याबाबत पूर्वसूचना जारी करण्यात आली आहे.
वाहतुकीस लावलेले निर्बंध ३० डिसेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. असेही सांगितले गेले आहे. तसेच बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद करुन ती मोरगाव- सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात आली आहे.
तसेच पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे. यामुळे यादिवशी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.