पुणे रिंगरोडमध्ये मोठा बदल!! नकाशात बदल झाल्याने वाचणार तब्बल 800 कोटी, घरेही पाडावी लागणार नाहीत, जाणून घ्या….

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोडबाबत चर्चा सुरू आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विकसित केल्या जाणाऱ्या वर्तुळाकार मार्गाच्या रिंग रोड आखणीत आता कासार आंबोली गावात पुन्हा बदल करण्यात आला आहे. यामुळे हा बदल नेमका कसा असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
यामध्ये पूर्वीच्या आखणीमध्ये येणाऱ्या एका बांधकाम प्रकल्पातील काही इमारती रिंग रोडमध्ये अडथळा ठरत असल्याने त्या इमारतीना वगळून गळून नवा मार्ग सुचविण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला पाठविला आहे. यामध्ये पैसे देखील वाचणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘एमएसआरडीसी’ने आखलेल्या रिंग रोडसाठीच्या आखणीत पश्चिम भागात कासार आंबोली या गावाचा समावेश आहे. यामध्ये महामंडळाच्या सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे त्या बांधकाम प्रकल्पातील रहिवाशांना कोणताही धक्का बसणार नाही. येथील ग्राहकांची अवास्तव मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने मार्गाच्या आखणीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महामंडळाने न्यायालयात, ग्राहकांची मागणी ही परवडणारी नाही. त्या बांधकाम प्रकल्पाची थोडीच बाजू रिंग रोडमध्ये जात आहे. यामुळे यासाठी मोठी रक्कम देणे शक्य नाही, असे स्पष्ट करून कासार आंचोलीमधून या इमारतीमधून जाणाऱ्या रिंगरोडची आखणी बदलण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे अनेकांची घरे देखील वाचणार आहेत.
दरम्यान, व्यावसायिकाने प्रकल्प उभारला आहे. त्या प्रकल्पात सुमारे तीनशेहून अधिक सदनिका आहेत. त्या इमारतींचा काही भाग रिंग रोडच्या मार्गात येत असल्याचे असल्याचे दिसून आले होते. यामुळे याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू झाली होती.