केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, ‘या’ योजनेसाठी १६०० कोटींचा निधी मंजूर..

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करून त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’साठी १६०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
या योजनेच्या माध्यमातून सिंचन पद्धतीचे आधुनिकीकरण, पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ, आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन यावर भर दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे.
सिंचन पाणीपुरवठा व्यवस्थेचे आधुनिकीकरण,पाणी व्यवस्थापन सुधारणा, शाश्वत जलसंपत्ती वितरणाची यंत्रणा उभारली जाणार आहे.
योजनेचा मुख्य उद्देश काय?
शेतकऱ्यांना स्थायी व सक्षम सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.
पाण्याचा वापर कार्यक्षम बनवणे आणि उत्पादनात वाढ साधणे.
सूक्ष्म सिंचन प्रणालीला प्रोत्साहन देणे, जसे की ड्रिप आणि स्प्रिंकलर सिंचन.
अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी विशेष उपाययोजना.
दरम्यान, केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध असूनही, राज्य सरकारांकडून अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे. अनेक राज्यांत सिंचनाखालील क्षेत्र वाढलेले नसल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य पातळीवर अधिक ठोस योजना व यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. असंही म्हंटले आहे.