आता उपचारासाठी केंद्र सरकार देणार 5 लाख रुपये, जाणून घ्या.


पुणे : सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता केंद्र सरकार विविध आजारावर उपचार घेत असलेल्यांना आयुष्मान कार्ड देणार आहे .ज्याच्या मदतीने आता सरकार 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देणार आहे.

या योजनेंतर्गत सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहेत. या योजनेसाठी कार्ड मोफत केले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आम्ही तुम्हाला त्याच्या नोंदणीसाठी पात्रतेबद्दल सांगत आहोत. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mera.pmjay.gov.in नावाच्या अधिकृत साइटला भेट द्या.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर भरा.
स्क्रीनवर दिसणारा कोड एंटर करा.

यानंतर OTP पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाका. त्यानंतर तुमचे राज्य निवडा. यानंतर मागितलेली सर्व माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला कळेल.

तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास, तुम्ही जवळच्या CAC केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर सुमारे 10 ते 15 दिवसांनी तुमचे आयुष्मान कार्ड बनवले जाईल. यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड , पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर हे आवश्यक आहे. 14555 आणि 1800 111 565 या क्रमांकावर तुम्ही यासंबंधी सर्व माहिती मिळवू शकता. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला 5 लाख रुपयांचा आरोग्य लाभ मिळतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!