मुंबई बोट अपघात प्रकरणी नेव्हीवर गुन्हा दाखल, प्रवाशाने केली तक्रार, तक्रारीत नेमकं काय?


मुंबई : मुंबईच्या समुद्रात अपघाताची धक्कादायक घटना घडली. नौदलाच्या बोटीने एका फेरीबोटीला धडक दिली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजुनही काही प्रवासी बेपत्ता आहे.

दरम्यान, या प्रकरणी स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकली तो व्हिडीओ काढला त्याच व्यक्तीची FRI नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवासी नाथाराम चौधरी यांनी ज्या व्यक्तीने बोट धडकली तेव्हाचा व्हिडीओ शूट केला होता. नाथाराम चौधरी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नौदलाच्या स्पीड बोट विरोधात नीलकमल बोट दुर्घटनेसंदर्भात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सीआर क्र 283/24 अन्वये 106(1), 125 (अ) (ब), 282, 324 (3)(5) BNS नुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!