Cabinet Meeting : शेतकऱ्यांना केलं राज्य सरकारने खूश! राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग, पुणे जिल्ह्यात किती रक्कम झाली वर्ग?


Cabinet Meeting मुंबई : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली.

त्याला जोड म्हणून राज्य शासनानेही ३० मे २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवात केली. या दोन्ही योजनांचे मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १ हजार ६९८ कोटी ७० लाख रुपये जमा झाले आहेत.

लाभ घेण्यास पात्र व्यक्ती…

या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी व त्यांचे १८ वर्षाखालील अपत्य) लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र २ हेक्टरपर्यंत आहे अशा पात्र शेतकरी कुटुंबियांस २ हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण ६ हजार रुपये प्रतीवर्षी लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांना द्यावयाच्या लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते.

जिल्ह्यातील तालुकानिहाय जमा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे….

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ५१ शेतकरी पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत १ हजार ४५० कोटी ५० लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यात ३६ हजार ९०३ शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटी ३० लाख रुपये, बारामती- ५१ हजार २७ शेतकरी १७३ कोटी ७० लाख, भोर- २४ हजार ९७० शेतकरी ७७ कोटी, दौंड ४२ हजार ६०६ शेतकरी १४६ कोटी ५० लाख, हवेली- १० हजार ५५१ शेतकरी ४३ कोटी ५० लाख, इंदापूर ४७ हजार ३२ शेतकरी १६३ कोटी, जुन्नर- ५२ हजार ५८६ शेतकरी १७३ कोटी ८० लाख, खेड- ४४ हजार ५४५ शेतकरी १४८ कोटी २० लाख, मावळ- १७ हजार ५३२ शेतकरी ५७ कोटी ५० लाख, मुळशी- १३ हजार १४७ शेतकरी ५६ कोटी ५० लाख, पुरंदर- ३१ हजार ९४२ शेतकरी ९७ कोटी ९० लाख, शिरुर- ५२ हजार ४५० शेतकरी १७३ कोटी ४० लाख आणि वेल्हे तालुक्यात ८ हजार ७६० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३० कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आले आहेत.

 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता केंद्रशासनाच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्यावतीने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनाअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १ हजार ६९८ कोटी ७० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!