ब्रेकिंग! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी, सगळं काही पंचांगानुसार होणार…!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. असे असताना याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या 22 जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात येत आहे. यामध्ये 15 मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तार 20 जानेवारीला होणे अपेक्षित होते. पण 21 तारखेला अमावस्या आहे. अमावस्या झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. यामुळे याची देखील चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार पंचांगानुसार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून मागे देखील सरकारवर टीका झाली आहे. आता लवकरच याबाबत माहिती समोर येईल.