सोरतापवाडी फाटा येथे बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरातील ३ लाख आणि १० तोळे सोनं लंपास; चोरींचे गुन्हे रोखण्यात पोलिस असमर्थ …!!

उरुळी कांचन : सोरतापवाडी फाटा (ता. हवेली ) येथे खिडकीचे गज कापून बंगल्यातील ३ लाख रुपये रोख आणि १० तोळे सोनं चोरटयांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चंद्रकांत मारुती आढाव ( रा.सोरतापवाडी , ता.हवेली ) यांच्या बंगल्यात चोरीचा प्रकार घडला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.१०) तीन चोरट्यांनी कटरने खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. कपाटातील ३ लाख आणि १० तोळे सोनं असा ऐवज चोरट्यांच्या हाती लागून घरातील मंडळी जागी होताच या तिघा चोरट्यांनी हा ऐवज घेऊन पसार झाले आहे.
या चोरीचा घटनेची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर श्वान पथकाने चोरट्यांचा मार्ग काढण्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी पाहणी केली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
उरुळीकांचन परिसरात चोरींच्या घटना नित्याच्याच
उरुळीकांचन परिसरात घरफोडी, व्यावसायिक दुकानांत चोरी अशा घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. चोरींचे सत्र चांगलेच जोमात आहे.
मात्र पोलिस प्रशासन मात्र गाठं झोपत असल्याची आवस्था या ठिकाणी आहे. गुन्हा उघडकीस आणण्याचे सोडाच पण नागरीकांनी खबर देऊनही गुन्हा नोंद करण्याची तसदीही पोलिस घेत नसल्याची आवस्था नागरीक उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.