कदमवाकवस्तीत व्यावसायिकाला कोयत्याने मारण्याची धमकी, सराईताला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक….

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजावर शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी गाड्या ढकलुन व्यावसायिकाला शिवीगाळ करून कोयत्याने मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
या गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी काळभोर यांचे कवडीपाट टोल नाक्याजवळ अंबिका गॅरेज आहे. फिर्यादी यांनी शुक्रवारी नेहमीप्रमाणे गॅरेज बंद करून थांबले होते. तेव्हा आरोपी मारुती कोळेकर हा हातात लोखंडी कोयता घेऊन तेथे आला.
यावेळी मी इथला भाई आहे असे म्हणून शिवीगाळ करत कोणी काय करतो ते बघतो असे म्हणून शिवीगाळ करत होता. यावेळी आरोपी मारुती कोळेकर याने गॅरेज मध्ये असलेल्या दुचाकी गाड्या ढकलुन दिल्या. आरोपीने लोकांचे दिशेने हवेत लोखंडी कोयता उंचावून कोणी जर मध्ये आलात तर एक एकाला कापून टाकीन, असे म्हणून दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी काळभोर यांना मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी नवनाथ काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी मारुती कोळेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.