Bus Station : राज्यातील १९३ बस स्थानकांचा होणार कायापालट, सुशोभीकरण करण्यासाठी ६०० कोटी खर्च होणार, जाणून घ्या..

Bus Station : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा लवकरच कायापालट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक” अभियानांतर्गत राज्यातील १९३ बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार असून, यासाठी एमआयडीसी ६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बस स्थानकांचा समावेश असून १४ कोटी ९३ लाख इतका निधीचा खर्च होणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली. Bus Station
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर २ कोटी २२ लाख,इचलकरंजी ३ कोटी २० लाख,गारगोटी ३ कोटी ६६ लाख, नरसिंहवाडी २ कोटी ६५ लाख,राधानगरी 3 कोटी २० लाख निधी खर्चाची तरतूद आहे. अल्पावधीतच या पाच बसस्थानकाचा कायापालट होणार आहे.
राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे .
या करारप्रसंगी उद्योग मंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटीया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.