मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील ‘या’ सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी, कारण..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लम्पी रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यावर आता सरकारने खबरदारी म्हणून काही निर्णय घेतले आहेत.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गाई आणि म्हशींमध्ये लम्पी रोगाचा फैलाव वेगाने होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक हैराण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
शिरुर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर आणि मुळशी तालुक्यात पाळीव गाई वर्णीय जनावरांमध्ये लम्पीचे संक्रमण हाेऊ लागले आहे. लम्पीचे संक्रमण रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडुन जनावरांची वाहतुक, जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे.
या आदेशात पुणे जिल्ह्यातील लम्पी संक्रमित सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवरही बंदी घालण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबराेबरच चाकण जनावरांचा बाजार ही बंद रहाणार आहे.
दरम्यान, पुण्याप्रमाणे सातारा, अकाेला जिल्ह्यात देखील लम्पीने शेतक-यांची झाेप उडवली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यांमधील काही तालुक्यात जनावरांच्या वाहतुकीस निर्बंध लावले आहेत. पशूसंवर्धन विभागाने लसीकरण माेहिमेवर जाेर दिल्याची माहिती आहे.
यामुळे पशुसंवर्धन विभाग देखील कामाला लागले आहे. लसीकरण वाढवणे देखील गरजेचे आहे. यामुळे आता सरकारने निर्णय घेतले आहेत.