पुण्याच्या बैलगाडा जोडीने मैदान मारले! जिंकली थार गाडी…!


पुणे : सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. यावेळी सर्वांना उत्सुकता लागली होती की, थार गाडी कोण जिंकणार. यावेळी मोठ्या प्रमाणात बैलगाडाप्रेमी उपस्थित होते. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासूर व कराडच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली आहे.

 

 

 

महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०० बैलगाडी स्पर्धेक सहभागी झाले होते. कर्नाटक मधील देखील अनेकजण यामध्ये सहभागी झाले होते.

 

 

 

 

अंतिम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी पटकावली. या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती.

 

 

 

 

या शर्यतीमध्ये थार गाडी कोण जिंकणार याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजर लागून राहिल्या होत्या, वेगवेगळ्या गटातून पार पडलेले शर्यतीनंतर चुरशीची अंतीम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ, यांच्या बकासुर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या बैलजोडीने मैदान मारले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!