Buldana News : दुचाकीच्या धडकेत रस्त्यावरील भिकारी मृत्युमुखी, पोलिसांनी त्याचे सामान तपासले अन् बसला धक्का, लाखो रुपये, चेकबुक, पासबुक, ATM अन्…

Buldana News : बुलडाण्यात एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच एक घटना घडली. एका दुचाकीच धडक बसून रस्त्यावरील भिकारी जखमी झाला आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला.

मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याचे सामन तपासले असता, त्यामध्ये लाखो रुपये सापडले. याशिवाय मेहकरमधील अनेक बँकांची पासबुक, एटीएम कार्ड्स आणि चेकबुक सापडली. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावा असा चक्रावून टाकणारा प्रकार उघडकीस आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. Buldana News
दीपक बाबुराव मोरे (वय ४८) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी चंदा दीपक मोरे, मुलगा धम्मपाल दीपक मोरे यांच्याकडे पोलिसांनी तपासादरम्यान सापडलेली रक्कम, पासबुक, एटीएम आणि चेक सुपूर्द केले.

ही घटना जिल्ह्यातील मेहकर हेथे घडली. दीपक मोरे असे त्या मृत भिका-याचे नाव आहे. तो मेहकर ते डोनगाव रस्त्यावरून सायकलवर जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराची त्याला धडक बसली आणि त्यामध्ये तो भिकारी गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात भरती करण्यात आले. मात्र अकोल येथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

भिकाऱ्याच्या गोधडीत मेहकर मधील अनेक बँकांची पासबुक, चेक बुक, एटीएम आणि चिल्लर भरलेली पिशवी पोलिसांना सापडली. ॲक्सिस बँकेच्या पासबुकमध्ये मे २०२३ पर्यंतच्या एंट्रीज सापडल्या. त्या खात्यात जवळपास २६००० रुपये आहेत.
मेहकर अर्बन बँकेच्या पासबुकमध्ये १ लाख ९ हजार २८४ रुपये आहेत. याशिवाय प्लास्टिकच्या दोन पिशव्यां ३ ते ४ हजार रुपयांची चिल्लर व इतर अनेक बँकांची पासबुक सापडली. त्यात मोठ्या रकमा आहेत. हा सगळा प्रकार पाहून पोलीस चक्रावून गेले.