१० दिवसांआधी ब्रेकअप; शेवटचं भेटायचं ठरलं अन्…प्रियकराने प्रेयसीवर केला धारदार शस्त्राने वार, नंतर…, घटनेने खळबळ

मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका तरूणाने तरूणीवर जिवघेणा हल्ला करून स्वत:ला संपवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरूणीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नरसिंग होममध्ये तरुणीवर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने टॅक्सीने तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ही घटना काळाचौकी परिसरात आज (शुक्रवारी, ता २४) घडली आहे.
मृत तरुणाचे नाव सोनू बरई आहे. तर जखमी मुलीचे नाव हे मनिषा यादव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, स्वतःचा जीव वाचवायला तरुणीने नर्सिंग होमचा सहारा घेतला होता. तर या घट प्रेमप्रकरणातून २४ वर्षीय तरुणीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीवर हल्ला केल्यानंतर सोनु बराई नावाच्या तरुणाने स्वतःला संपवलं आहे. ८-१० दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता.
दोघांमध्ये प्रेमसंबध होते, मात्र मृत तरुण वारंवार मुलीवर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये ८ दिवसापूर्वी वाद झाला होता. यातून दोघं ब्रेकअप झाले होते. मृत तरुणाने शेवटचे भेटण्यासाठी मुलीला नर्सिंग होममध्ये बोलावले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला, यावेळी राग अनावर
दरम्यान, झालेल्या तरुणाने मुलीवर धारदार शस्त्राने वार केले. मुलीवर हल्ला केल्यानंतर त्याच शस्त्राने तरुणाने स्वत:ला मारून घेत आयुष्य संपवले. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.