ब्रेकिंग!लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत धक्कादायक खुलासा ; दिल्ली नव्हे तर टार्गेटवर राम मंदिर अन…..

दिल्ली : राजधानी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला. याप्रकरणी तपास यंत्रणेतून धक्कादायक माहिती समोर आली,आहे.या दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये स्फोट घडवायचा नव्हता. यांचे टार्गेट वेगळेच होते.गेल्या काही दिवसांपासून या स्फोटाची योजना आखली जात होती. त्यांना जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोहोचवायचे होते आणि त्यांची टार्गेट अयोध्या आणि वाराणसी होते. अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर विविध ठिकाणांहून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दहशतवाद्यांनी अयोध्या आणि वाराणसीतील राम मंदिराला टार्गेट केले होते. ज्याचे एक मॉड्यूल तयार केले होते. तपासात हे स्पष्ट झाले की, या दहशतवाद्यांना दिल्ली नव्हे तर अयोध्येत स्फोट घडवायचा होता. अटक करण्यात आलेली शाहीन हिने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते. हल्ला करण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी अटक करण्यात आली. त्यांची स्फोटकेही जप्त करण्यात आली.स्फोटात वापरलेले साहित्य बांगलादेश आणि नेपाळच्या मार्गे भारतात आणले गेले. मोठा कट दहशतवाद्यांकडून आखण्यात आला होता..
दरम्यान आतापर्यंतच्या तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये कोणताही टायमर नव्हता. हा स्फोट घाईघाईत झाला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित 300 किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. याकरिता दहशतवाद्यांकडून कसून चाैकशी केली जात आहे. यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
