Breaking News : वेळ घ्या, पण आरक्षण द्या! जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, सरकारला दिली नवी डेडलाइन..


Breaking News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. मात्र त्यांनी आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत देतो आहे असं सांगितलं आहे. तसंच उपोषण आपण मागे घेतलं असंही जाहीर केलं आहे.

वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी घोषणा करत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी (ता. २) उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, जरांगे पाटलांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. Breaking News

गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. दरम्यान, सरकारचे शिष्टमंडळ आज (ता.२) जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी जालन्याला गेले होते. यानंतर उपोषणाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना केली. Breaking News

सरकारला वेळ कशासाठी हवा आहे, ते समोर येऊन सांगा. आरक्षण कसे द्यायचे, कधी देणार ते आम्हाला कळू द्या. त्यावर समाजाशी बोलून आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू; पण वेळ मारून नेऊ नका. तुम्हाला गरज असेल तर चर्चेला या, नसेल तर तिकडेच विमानात झोपा, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सरकारला सुनावले होते.

सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पाणीही घेणार नसल्याचा निर्णय बुधवारी संध्याकाळी जाहीर केला होता. मात्र, सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी गुरुवारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. यानंतर सरकारला २ जानेवारी पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

निवृत्त न्यायाधीशांनी यावेळी जरांगे पाटील यांच्या मागण्या लिहून घेतल्या. जरांगे पाटील यांनी न्यायाधीशांकडे चार पाच महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्याच लिहून घेण्यात आल्या. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं, आयोगाला सर्व्हेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं, सुविधा आणि आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी, सर्व्हेक्षणासाठी एकापेक्षा अधिक संस्थानेमण्यात याव्यात, सर्व्हेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये, आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!