Breaking News : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले, उद्यापासून…

Breaking News : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस असताना त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात आहे. अशातच आज काय तोडगा निघणार का? याकडे लक्ष लागलेलं असताना मराठा आरक्षाणसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. Breaking News

शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटा नुसार सरकार तत्काळ प्रमाणपत्र वटपाला सुरुवात करणार आहे. सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. Breaking News
कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे समितीच्या अहवालावरून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

या निर्णयावरून उद्यापासून कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ उपमितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रालयात बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात तहसीलदारांची उद्या बैठक होईल, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतील. तहशीलदारांची बैठक बोलवून यामध्ये जुन्या नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाण पत्र देण्याच्या सूचना केल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारून पुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात ११ हजार ५३० नोंदी मिळाल्या आहेत.
ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.