ब्रेकिंग! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; नेव्हल डॉग परिसरात दहशतवादी हल्ला होणार..

मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुंबईत धमकीच्या कॉलने सपाटा लावला आहे.अशातच आता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने दिली आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून परिसरात सर्च ऑपरेशन सुद्धा राबवल जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, धमकीचा मेसेज देणाऱ्या संबंधित व्यक्तीने त्याचं नाव जहांगीर शेख असल्याचंही म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याचं कळतंय. नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या फोननंतर नेव्हल डॉक परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं गेलं. पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. नेव्हल डॉक परिसरात सर्च ऑपरेशन राबविल्यानंतर काही संशयास्पद आढळलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र सतर्कता म्हणून पोलिसांनी या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ दहशतवादी स्फोट झाला होता. एका कारमध्ये हा स्फोट झाला आणि त्यात 13 जणांनी आपले प्राण गमावले होते. त्यानंतर देशातील महत्त्वाच्या शहरांना हाय अलर्ट दिला होता. प्रमुख शहरांमधील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं आहे.
