ब्रेकिंग! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ; थेट पुढच्या वर्षीची तारीख….कोर्टात नेमकं काय घडलं?

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनाव आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवारी) सुनावणी अपेक्षित होती. मात्र, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार सोबत घेत शरद पवारांची साथ सोडली होती. अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले, पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. काही काळानंतर कोर्टाने नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या गटाला दिले होते. मात्र आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही कोर्टात आहे. अजूनही याचा निकाल लागलेला नाही. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यात नेमकं काय घटलं ते जाणून घेऊयात.

कोर्टात काय घटलं?

आज दुपारी सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीच्या सुरुवातील शरद पवारांचे वकील कपिल सिब्बल यांनी मला सुनावणीसाठी 2 तास लागतील अशी माहिती दिली. यावर कोर्टाने तुम्ही सुरुवातीला कोणत्या प्रकरणाचा युक्तिवाद करणार आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर वकिलांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर आता 21 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुनावणीसाठी पुन्हा एकदा वाट बघावी लागणार आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आता 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यावेळी अजिप पवारांचे वकील पक्षातून बाहेप पडलेले आमदार अपात्र कसे नाहीत याबाबत युक्तीवाद करणार आहेत. तर शरद पवारांच्या वतीने पक्ष सोडताना या आमदारांनी नियमांचे उल्लंघन केले आणि त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी याबाबत मागणी करणार आहेत. या सुनावणीनंतर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
