ब्रेकिंग! पार्थ पवारांवर प्रशासन पुन्हा मेहरबान, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात क्लिन चीट, अहवालात धक्कादायक खुलासा?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी चांगले चर्चेत आले आहेत. याप्रकरणी आता पार्थ पवार यांना क्लिन चीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंद्राक अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या अहवालात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांचे नाव अहवालात असून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. राज्य सरकार आणि महसूल विभागाकडून मुठे समिती सादर करण्यात आली होती. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. सहनोंदणी महानिरिक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या अहवालात आता पार्थ पवार यांच नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

या प्रकरणातील गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने चौकशी पूर्ण केली असून हा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण कडे सादर केला आहे.

       

मुठे समितीच्या अंतिम चौकशी अहवालात दोषारोप नेमके कोणावर ?

1. सब रजिस्टार रवींद्र तारू
आरोप…शासकीय जमिनीच उतारा बंद असतानाही दस्त नोंदणी करवून घेतली तीही अवघ्या 500 रूपयांच्या स्टँम्प ड्यूटीवर…!!!

2. शितल तेजवानी
आरोप…
272 वतनदारांची पॉवर ऑफ अँटर्नी दाखवून शासनाची जमीन परस्पर अमेडिया कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला

3 अमेडिया कंपनी आणि दस्त नोंदणी करणारे कंपनीचे 1% भागधारक दिग्विजय पाटील, याउलट कंपनीचे 99% टक्के भागधारक पार्थ पवार यांच्या नावाचा अहवालात साधा नामोल्लेखही नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!