साताऱ्यात खळबळ!! पोराला बैलगाडा शर्यतीचा नाद, शुल्लक कारण आणि बापावर तलवारीने सपासप वार…


सातारा : सातऱ्यात एका तरुणाला बैलगाडा शर्यतीचा इतकं वेड लागलं की, त्यासाठी तरुणाने जन्मदात्या बापाला देखील सोडलं नाही. पोटच्या पोराने बापावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारून त्यांच्यावर तलवारीने वार केल्याची घटना साताऱ्यातील कराडमधील हजारमाची येथे घडली आहे. बापलेका मधील जीवघेण्या भांडणांच कारण ठरला शर्यतीचा बैल… त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा नाद चांगलाच महागात पडला आहे.

मुलाने केलेल्या तलवार हल्ल्यात वडील संजय शिंदे हे जखमी झाले असून त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणात अवघा २४ वर्षाचा मुलगा आकाश संजय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वयाच्या २४ व्या वर्षी मुलगा आकाश शिंदे याने शर्यतीचा बैल खरेदी केला होता. आकाशच्या शर्यतीच्या बैलांवर लय जीव… वडिलांना त्याने बैल सांभाळायची जबाबदारी दिली. पण वडिलांनी बैलाला नीट सांभाळला नाही, असा आरोप त्याने केला.

याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद पेटला. शर्यतीचा बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही, असं म्हणून वडील संजय शिंदे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केलं. तो एवढ्यावरच थांबला नाही. थेट घरात गेला अन् तलवार आणली.

तलवार घेऊन आला अन् बापाच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी त्याने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. पण गळ्यावर केलेला वार चुकला अन् वार कानावर बसला. यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने संजय शिंदे यांना दवाखान्यात नेलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!