जुन्नरमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि कॉलेज तरुणीची बॉडी सापडली, पत्नीच्या तक्रारीनंतर धक्कादायक माहिती आली समोर…


जुन्नर : येथील आदिवासी भागात दुर्गावाडी कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत तरुण आणि तरुणी अशा दोघा जणांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. याबाबत जुन्नर पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली आहे. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले. रामचंद्र साहेबराव पारधी आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयीन युवती रुपाली संतोष खुटाण अशी त्यांची नावे आहेत.

रामचंद्र पारधी हे मूळ दुर्गावाडीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपासून दोघे बेपत्ता होते, याबाबत त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती. यामुळे याबाबत तपास सुरु होता. रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती.

याबाबत एक दिवस स्थानिक ग्रामस्थांना जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे दिसले. ही गाडी अनेक दिवसांपासून याच ठिकाणी होती. नंतर कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळल्या. रेस्क्यू टीमने दरीत उतरून शोध घेतला, तेव्हा रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळले.

यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत. याबाबत त्यांचे काय संबध होते याबाबत सध्या तपास केला जात आहे. जुन्नर रेस्क्यू टीमचे रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, यांनी याबाबत मदत केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!