संस्थाचालकाची महिला शिक्षकास शरीर सुखाची मागणी ; वाच्यता केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी ; कुठे घडला हा प्रकार ..!!

पुणे : शाळेतील महिलेला अश्लिल शेरेबाजी करुन मिठी मारुन शारीरीक सुखाची मागणी करुन विनयभंग करणार्या शाळेच्या प्रशासकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत पुष्टी (वय ५२) असे या शाळेच्या प्रशासकाचे नाव आहे. हा प्रकार जे एन पेटिट टेक्निकल हायस्कुल परिसर व शिक्रापूर येथील शिवतारा पर्यटन स्थळ येथे ५ सप्टेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत पुष्टी हा शाळेचा प्रशासक आहे. त्याने फिर्यादीस अश्लिल शेरेबाजी करुन फिर्यादी यांना मिठी मारली. फिर्यादी यांच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली.
त्याबाबत फिर्यादी यांनी नापसंती व्यक्त केल्यावर घडल्या प्रकाराबाबत कोणाला माहिती दिल्यास नोकरीवरुन काढण्याची धमकी दिली. शरीर सुखाबाबत बोलून फिर्यादी यांचा विनयभंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.