समुद्रात बोट अचानक झाली पलटी, नौदलाने १८ जणांना काढले बाहेर, नेमकं घडलं काय?

अलिबाग : येथील किनाऱ्यालगत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे आज पहाटे चार वाजता एका बोटीला आग लागल्याची घटना समोर आली. आग अक्षी अलिबाग येथे किनाऱ्यापासून ६-७ नॉटिकल मैल अंतरावर राकेश गण यांच्या मासेमारी बोटीला आग लागली. यामुळे मोठी पळापळ झाली.
याबाबत बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच नौदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने बोटीतील सर्व १८ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्वजण सध्या सुरक्षित आहेत.
भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल वेळीच घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेत बोटीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीने बोटला पूर्णपणे वेढा घातल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये बोट एका बाजूला झुकली आहे. नौदल मच्छीमारांना वाचवत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अजून सविस्तर माहिती समोर आली नाही. याबाबत तपास सुरू आहे. मोठा अनर्थ यावेळी टळला आहे.