लाडक्या बहिणींचा ‘सोन्याचा आशीर्वाद’! विजय थलपतींच्या TVKला मोठी उभारी, 8 ग्रॅम सोन्याच्या घोषणेमुळे महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत


तमिळनाडू : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने धक्कादायक कामगिरी करत मोठा राजकीय उलटफेर घडवला आहे. या यशामागे ‘लाडक्या बहिणींचा आशीर्वाद’ निर्णायक ठरल्याची चर्चा जोरात आहे. विशेषतः महिलांसाठी लग्नावेळी 8 ग्रॅम सोनं देण्याच्या घोषणेमुळे मतदारांमध्ये मोठी आकर्षण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

234 जागांपैकी 200 हून अधिक जागांचे कल समोर आले असून TVKने 80 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवडणुकीपूर्वी विजय यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवत केलेल्या घोषणा, घराघरात पोहोचलेला प्रचार आणि भावनिक जोडणी यामुळे ‘लाडक्या बहिणी फॅक्टर’ निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे.

राजकीय वर्तुळात आता याला थेट “महाराष्ट्र पॅटर्न” म्हटलं जात आहे. महाराष्ट्रात महिलांवर आधारित योजनांमुळे राजकीय समीकरण बदलल्याचे उदाहरण देत, त्याच पद्धतीने तमिळनाडूतही विजय थलपतींनी प्रभाव टाकल्याची चर्चा सुरू आहे. 8 ग्रॅम सोनं ही घोषणा केवळ आश्वासन न राहता मतांमध्ये रूपांतरित झाली, असे विश्लेषक सांगत आहेत.

दरम्यान, सत्ताधारी DMK आणि काँग्रेस आघाडी पिछाडीवर गेली असून AIADMK दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सर्वाधिक चर्चेत TVK आणि विजय थलपतींची झंझावाती एन्ट्री आहे. पहिल्याच निवडणुकीत एवढी मोठी आघाडी मिळाल्याने त्यांना राज्यातील “नवा गेमचेंजर” मानले जात आहे.

विजय थलपतींनी प्रचारादरम्यान केलेल्या मंदिर भेटी, जनतेशी थेट संवाद आणि महिलांसाठी आर्थिक आश्वासनांमुळे मोठा भावनिक प्रभाव निर्माण केला. त्यामुळेच “लाडक्या बहिणी” या फॅक्टरने त्यांना थेट सत्तेच्या समीकरणात आणून उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!